ज्ञानदीप भडगाव व मोरवंडे – बोरज येथे JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क मार्गदर्शन

खेड –
ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड ( रत्नागिरी ) संचालित ज्ञानदीप विद्या मंदिर , भडगाव व ज्ञानदीप इंग्लिश मीडिअम स्कूल , मोरवंडे – बोरज मध्ये JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दि. 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानदीप विद्या संकुल , मोरवंडे – बोरज येथे व सायंकाळी ठीक 4:00 वा. ज्ञानदीप विद्या संकुल भडगाव – खोंडे येथे आयोजित करण्यात आले आहे.

सदर मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. महेश अभ्यंकर, वैद्यकीय सल्लागार, औषध आणि रणनीती तज्ज्ञ, लेखक, संशोधक व NEET/JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे समुपदेशक आहेत. हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सदर मार्गदर्शन शिबिराचा इ. 10 वी 11 वी व 12 वी Science च्या सर्व विद्यार्थी व पालकांनी तसेच रायगड – रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधीतांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. अरविंद तोडकरी यांनी केले आहे.