खेड नगर परिषदेत सन्मानजनक जागा वाटप न झाल्याच्या कारणास्तव नाराजी
रत्नागिरी :
खेड नगर परिषदेत सन्मानजनक जागा वाटप न झाल्याच्या कारणास्तव भाजपच्या माजी आमदारासह जिल्हाध्यक्ष एकूण 39 पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे यांना पत्र लिहून पाठवले.
शिवसेनेचे खेडचे आमदार योगेश कदम हे मीडिया समोर येऊन माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि वैभव खेडेकर यांच्या विरोधात अपमान जनक बोलत असल्याचा पत्रात आरोप करण्यात आला आहे.
खेड नगरपरिषद स्वबळावर जिंकण्याची शक्यता असताना केवळ तीनच जागा मिळणे अत्यंत चुकीचे असून मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पदाधिकाऱ्यांची तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
अशा प्रकारच्या जागा वाटपामुळे पक्षाचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. अशी कैफियत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे. खेड नगर परिषदेचे जागावाटप करताना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याची देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भावना आहे.
शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी मीडिया समोर बोलणे तातडीने थांबवावे; जागावाटप न्याय आणि सन्मानजनक व्हावे अशी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची पत्राद्वारे मागणी केली आहे
खेड नगर परिषदेमध्ये एकूण 20 जागा असून जागा वाटपामध्ये 17 जागा शिवसेना तर तीन जागा भाजपला असा महायुतीचा प्रस्ताव आहे.










