राजापूर शहरात उबाठा गटाला मोठा धक्का, गुरववाडी व वरचीपेठ येथील अनेकांचा शिवसेनेत प्रवेश…

आ.किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेनेचा भगवा हाती…

राजापूर (वार्ताहर): राजापूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची धामधुम सुरू असताना शिवसेनेने उबाठा गटाला जोरदार धक्का दिला आहे. शहरातील गुरववाडी व वरचीपेठ परिसरातील उबाठा गटाचे पदाधिकारी व नागरिकांनी शिवसेना मुख्यनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी उबाठा गटाचे प्रभाकर गुरव (उपशहरप्रमुख), ऋषिकांत अमरे (युवाउपशहरप्रमुख), विनायक गुरव, (शहर विभागप्रमुख), विश्वनाथ गुरव (बूथ प्रमुख), शुभांगी गुरव (महिला उपशहरप्रमुख) यांच्यासह गुरववाडीतील अनेक कार्यकर्त्यांनी उबाठाचा त्याग करून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
तर यावेळी वरचीपेठ येथील महापुरूष सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप अमरे, बाळा तांबट यांसह वरचीपेठ येथील शेकडो समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे आमदार किरण सामंत यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना विधानसभाक्षेत्रप्रमुख राजू कुरूप, संपर्कप्रमुख प्रकाश कुवळेकर, संजय ओगले, अविनाश पराडकर,
या प्रवेशामुळे आगामी राजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकीय समीकरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. उबाठा गटाला हा धक्का मानला जात आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे.” आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, त्याचा परिणाम म्हणून आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले.