जिल्हा परिषद शाळा बामणोली नं. १ येथे बालदिनानिमित्त विविध उपक्रम

चिपळूण : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बामणोली नंबर १ येथे विविध उपक्रम आयोजित करून बालदिन साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी रॅली सुद्धा काढण्यात आली.
देशाचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. जिल्हा परिषद शाळा बामणोली येथे सकाळी हा बालदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा खेळ असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावरती विद्यार्थ्यांनी सुंदर अशी भाषणातून मांडणी केली. यावेळी दुपारी रॅली सुद्धा काढण्यात आली. बालदिनाचा मुलांनी आनंद घेतला. बालदिनाबाबत विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका प्राजक्ता सुर्वे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. शाळेतील सहशिक्षिका यांनी सुद्धा मुलांना देशाचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी विविध पैलूंची माहिती सांगितली. हा संपूर्ण कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सहशिक्षिका विशाखा गमरे, मेघना मांजरेकर, महिला वर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.