खेड – बालदिनाचे औचित्य साधत आणि लायन प्रसाद अनंत शेठ यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व दापोली लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना महिनाभरासाठी आवश्यक असलेले जिन्नस तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर आणि दापोली लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल मेहता यांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखत हा उपक्रम राबवल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. माजी रिजन चेअरमन आशिष मेहता, मनोहर जैन, डिस्टिक सेक्रेटरी सुरेश चिकणे, माजी अध्यक्ष रोहन विचारे आणि संदीप मोरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवर्ग उपस्थित होता. सामाजिक संवेदनशीलतेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे कर्णबधिर विद्यार्थ्यांना शैक्षणिक व दैनंदिन गरजांची महत्त्वपूर्ण मदत मिळाली. बालदिनाच्या निमित्ताने झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा ठरला.










