दापोली | प्रतिनिधी:
दापोली- हर्णे महामार्गावर पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या आसूद जोशीआळी येथील भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मृत्यू झालेल्या मध्ये मीरा बोरकर हिची एक्झिट चटका लावणारी ठरली आहे. अत्यंत हुशार असलेली सीईटीच्या परीक्षेत तब्बल यावर्षी 96 टक्के गुण मिळवून चमकलेली मीरा महेश बोरकर महाविद्यालयाचा फॉर्म भरण्यासाठी दापोली येथे आली होती. आपल्या पाडले या गावात मोबाईलचे नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवर ओटीपी येत नाही त्यामुळे फॉर्म भरण्यास अडचणी येतात म्हणून ती दापोली येथे महाविद्यालय प्रवेशाचा ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आली होती दापोलीत हा फॉर्म भरून झाल्यानंतर याच दिवशी केळशी मार्गावर धावणारी दुपारी सव्वा बाराची एसटी गाडी कॅन्सल झाली होती. त्यामुळे मीरा वडाप मध्ये बसली. तिला आयटी महाविद्यालयात मुंबई येथे प्रवेश घ्यायचा होता यासाठी तिने गेल्या वर्षी 93 टक्के मार्क मिळाल्यानंतरही एक वर्षाची शैक्षणिक गॅप घेतली व यावर्षी जिद्द बाळगत सीईटी मध्ये सरस मार्कही मिळवले.
याच दरम्यान हा फॉर्म भरत असताना दापोली येथे मूळचे पाडले गावातील असलेले शेजारी असलेले पंचायत समितीचे माजी उपसभापती सदस्य रवींद्र सातनाक यांचीही योगायोगाने भेट झाली होती त्यांनीही तीला आपण बरोबर जाऊ मी माझं काम आटपून येतो इतकही सांगितलं मात्र तिच्या तिला वडिलांचा फोन आला व शेजारी असलेल्या काकांना घरी येण्यास उशीर होईल थोडावेळ लागणार असल्याने तिने वडाप गाठले आणि इथेच मोठा घात झाला. वडाप प्रवास रिक्षेने मीरा प्रवास करत होती त्याच गाडीचा आसूद येथे भीषण अपघात झाला आणि यातच दुर्दैवाने मीराचा मृत्यू झाला. अत्यंत हुशार असलेल्या मीराने अशाप्रकारे घेतलेली अकाली एक्झिट अनेकांना चटका लावणारी ठरली आहे.
पाडले येथील इयत्ता पहिली ते पाचवी जिल्हा परिषद शाळेत नंतर दापोलीच्या आर आर वैद्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले व अकरावी बारावी तिने रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केल होते व त्यानंतर आयटीमध्ये प्रवेश घ्यायचा असल्याने तिने सीईटीची परीक्षा दिली. मीराचे वडील शेतकरी आहेत मिरच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.
*दोघींची भेट हुकली आणि अनर्थ घडला…*
आपल्या घरी पाडले येथे घरी जाण्यासाठी निघालेली मीराची शेजारील मैत्रीण भार्गवी दापोली एसटी बस स्टँड मध्ये आली होती तिने एसटी सुटण्यासाठी तब्बल दुपारी तीन वाजेपर्यंत वाट पाहिली मात्र मीरा बोरकर हिला मामाने एसटी कॅन्सल झाल्याने वडाप रिक्षाने जाण्यासाठी सोडले होते. मीराने यापूर्वी एसटी शिवाय कधीच प्रवास केलेला नाही मात्र तिने घेतलेले एक्झिट याला एसटी प्रशासनाचा बेजबादार व भोंगळ कारभारही तितकाच कारणीभूत ठरला आहे त्यामुळे एसटी प्रशासनाच्या या भूमिकेबद्दलही संताप व्यक्त होत आहे. पण जर का मीरा एसटी स्टॉल वरती आली असती व मीराची मैत्रीण भार्गवीची भेट झाली असती तर या दोघींनी एकत्रच दुपारी तीन वाजता सुटणाऱ्या एसटी बस मधून तिथून प्रवास केला असता हे निश्चित होत पण निष्ठूर नियतीने हे होऊ दिले नाही. मीराची आठवण आली मैत्रीणींना रडू कोसळते आहे.