रेडी गावातील विविध नागरी सुविधा कामांचा मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी गावातील विविध कामांना नागरी सुविधा जिल्हा वार्षिक योजना, कोकण पर्यटन मधुन मंजूरी मिळाली आहे. या कामांचे मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत भूमिपूजन काण्यात आले.

रेडी गावातील विविध नागरी सुविधांची कामे हाती घेण्यात आली असून या कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

यामध्ये, विठोबा मंदिर ते सिद्धेश्वर मंदिर रस्ता, यशवंत गड रस्ता नूतनीकरण, मुख्य रस्ता ते परुळेकर घर रस्ता, मुख्य रस्ता ते कामत घर रस्ता, गावातळे गणेशघाटी रस्ता भूमिपूजन तसेच तेरेखोल तिठा भीमनगर सोलर हायमास्ट, हुडातर सोलर हायमास्ट या कामांचा समावेश आहे.

यावेळी माजी जि.प .शिक्षण सभापती प्रितेश राऊळ ,सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच आनंद भिसे, सदस्य नमिता नागोळकर, शमिका नाईक, मानसी राणे, रिया सावंत, स्वप्निल राणे, रश्मी रेडकर, तंटामुक्ती अध्यक्ष वैभव असोलकर, ग्रामपंचायत अधिकारी गणेश बागायतकर, लिपिक नाना आसोलकर, कर्मचारी सिद्धेश गोसावी तसेच ग्रामस्थ नामदेव राणे, श्याम रेडकर, नंदू रेडकर, जय राणे जगदीश गवंडी, काका गवंडी, दादा राणे, आनंद आसोलकर विजय गवंडी, आबा गवंडी, दादा नाईक, बंड्या राणे, मुकुंद राणे सुनील सातजी, महेंद्र सातजी, दाजी सातजी, नंदू मांजरेकर, तात्या राणे,अमोल राणे,माजी उपसरपंच दीपक राणे, पोलीस पाटील सीताराम राणे,अमित मडये आदी उपस्थित होते.