नगराध्यक्ष पदासाठी २ तर नगरसेवक पदासाठी ६ अपक्ष उमेदवार रिंगणात….
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष एका मेका समोर उभे ठाकले आहेत. आज अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. वेंगुर्ले मध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी सहा अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक २ डिसेंबर रोजी पार पडत आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वच उमेदवार प्रचारामध्ये व्यस्त आहेत. दरम्यान अपक्ष उमेदवारांना आज निवडणूक विभागाकडून चिन्ह वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून उभे असलेले सामाजिक कार्यकर्ते नंदन मेघश्याम वेंगुर्लेकर यांना गॅस सिलेंडर तर सोमनाथ वसंतराव टोमके यांना कपाट हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या पक्ष उमेदवारांमध्ये प्रभाग क्र. १ ब मध्ये वंदन मेघःशाम वेंगुर्लेकर (अपक्ष) यांना लायटर हे चिन्ह, प्रभाग ४ ब, मध्ये योगेश प्रभाकर वारंग (अपक्ष) यांना छताचा पंखा हे चिन्ह, प्रभाग क्र. ५ ब मध्ये सुयोग विजय चेंदवणकर (अपक्ष) यांना आईस्क्रीम आणि अय्याज नजीर शेख (अपक्ष) यांना कपबशी हे चिन्ह, प्रभाग क्र. ९ अ मध्ये चंद्रकांत कृष्णा जाधव (अपक्ष) यांना टेबल हे चिन्ह, तर प्रभाग क्र. ९ ब मध्ये रत्नप्रभा सोमनाथ टोमके (अपक्ष) यांना नारळ हे चिन्ह मिळाले आहे.
या अपक्ष सर्व उमेदवारांना पुढील पाच दिवसात आपले निवडणुकीचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवावे लागणार आहे.












