अनुष्का गावकर आणि संतोषी जंगम यांची कोकण विभागीय खो खो संघात निवड

. ओटवणे (प्रतिनिधी)सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील कु अनुष्का आनंद गावकर आणि कु संतोषी भिवा जंगम या दोन्ही विद्यार्थिनीं महाविद्यालयाच्या शिरपेचात क्रीडा विभागात मानाचा तुरा खोवला असून नुकत्याच पार पडलेल्या कोकण विभागीय स्पर्धेत आपल्या अप्रतिम खेळाचा डंका गाजवीला असून या दोघांची खो खो संघात निवड झाली आहे. याबद्दल या दोन्ही विद्यार्थिनीवर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांची पाली येथे होणाऱ्या मुंबई युनिव्हर्सिटी खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दोनी विद्यार्थिनी एस.पी.के. महाविद्यालयात कला शाखेच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या या मुलींनी अभ्यासाबरोबर क्रीडा प्रकारातही आपली छाप उमटविली आहे. अनुष्का गावकर ही ओटवणे गावातील तर संतोषी जंगम ही सावंतवाडी येथील आहे. यापूर्वीही या दोन्ही विद्यार्थिनींनी आपल्या म्हविद्यालयाचा प्रतिनिधित्व करताना तालुका व जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा मध्ये यश संपादन करत आपला दबदबा निर्माण केला आहे.त्यांच्या या यशाबद्दल या दोन्ही विद्यार्थिनींचे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत खेमसावंत भोसले, संस्थेच्या चेअरमन शुभदादेवी भोसले, संचालक युवराज लखमसावंत भोसले, संचालक डी टी, देसाई, डॉ सतीश सावंत, प्राचार्य डॉ डी एन भारमल, क्रीडा शिक्षक सीए नाईक, प्राध्यापक एम ए ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.