चिपळूण :– संघर्ष क्रीडा मंडळ चिपळूण आयोजित चिपळूण हात मारताना स्पर्धा यंदा रविवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून विविध राज्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून तसेच शालेय गटातील स्पर्धेसाठी अनेक धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यांमधून या स्पर्धेसाठी 21 किलोमीटर आणि दहा किलोमीटर साठी सुमारे २५० स्पर्धकांनी आपली नोंदणी केलेली आहे तसेच शालेय गटात पाच किलोमीटर साठी सुमारे बाराशे स्पर्धक सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे.
सदर स्पर्धेसाठी एअर मार्शल श्री हेमंत भागवत, श्री प्रसाद देवस्थळी रत्नागिरी, सौ संध्या दाभोळकर यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर या स्पर्धेला कॅप्टन म्हणून डॉक्टर मनीषा वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
स्पर्धेत वयांचे पाच ग्रुप करणेत आले असून ते पुरुष व महिला या विभागात येतात. हाफ मॅरेथॉन साठी पुरुष महिला विजेत्याला प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एकूण १०२ रोख बक्षिसे देण्यात येणार असून त्यांची एकूण रक्कम रुपये ६ लाख २८ हजार एवढी आहे.
२१ किलोमीटर करिता पुरुष व महिला गटात ओपन गट, ३१ ते ४० वय, ४१ ते ५० वय, ५१ ते ६0 वय, आणि साठ वर्षावरील असे गट आहेत. तसेच १० किलोमीटर व ५ किलोमीटर करिता हीच वयोमर्यादा आहे. आणि शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी शालेय गट ठेवण्यात आलेला आहे.
रजिस्ट्रेशन फी अंतर्गत प्रत्येक स्पर्धकाला टी-शर्ट, बॅग, फिनिशर मेडल, ई सर्टिफिकेट, टाइमिंग चीप, आणि ब्रेकफास्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे . आमची वेबसाईट WWW.run Chiplun.in ही त्यावर आपण आपले रजिस्ट्रेशन दिनांक २२ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत करू शकता.
चिपळूण मधील सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था आमची मॅरेथॉन थीम पार्टनर आहे. ही संस्था सन १९९२ मध्ये स्थापन झाली असून, निसर्गाचा ऱ्हास आणि प्राणी संरक्षण हे या संस्थेचे ध्येय आहे, गेली पाच वर्ष प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट म्हणून काम करीत आहे. आत्तापर्यंत संस्थेने 250 टन प्लास्टिक कचरा जमा केला असून कोकणातील नद्या व जंगले यांचे संवर्धन केले आहे. “धावू प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी” ही संकल्पना घेऊन संघर्ष क्रीडा मंडळाबरोबर थीम पार्टनर म्हणून काम करीत आहे.
सहभागी स्पर्धकांनी बीप घेताना १०० ग्राम प्लास्टिक जमा करावयाचे आहे, त्याचे त्यांना कुपन देण्यात येईल आणि लकी ड्रॉ काढण्यात येईल विजेत्याला आकर्षक बक्षीस देण्यात येईल.
शालेय विद्यार्थ्यांसाठी वय वर्ष १४, १५, १६, आणि १७ हे गट करण्यात आले असून त्यामध्ये मुले व मुलींना सहभाग घेता येईल. त्यांना कोणतीही एन्ट्री फी ठेवण्यात आलेली नाही मात्र त्यांनी प्रत्येकी २ किलो सुके व स्वच्छ प्लास्टिक आपापल्या शाळेकडे जमा करावयाचे आहे. आयोजक संस्था ते घेऊन जाणार आहे.
चिपळूण हाफ मॅरेथॉन साठी ब्रँड अँबेसिडर म्हणून रिटायर्ड एअर मार्शल श्री हेमंत भागवत आणि श्री प्रसाद देवस्थळी रत्नागिरी, तसेच खेर्डी चिपळूण येथील डॉक्टर सौ. संध्या दाभोळकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेला कॅप्टन म्हणून डॉक्टर मनीषा वाघमारे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेत व्हर्च्युअल रनर ही कॅटेगरी ठेवण्यात आली असून स्पर्धकांनी त्याच्या गावी धावायचे आहे आणि त्याचे रेकॉर्ड संयोजकांकडे पाठवायचे आहे. त्यांना फिनिशर मेडल आणि ई सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.
चिपळूण मधील सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था आमची मॅरेथॉन थीम पार्टनर आहे. ही संस्था सन १९९२ मध्ये स्थापन झाली असून, निसर्गाचा ऱ्हास आणि प्राणी संरक्षण हे या संस्थेचे ध्येय आहे, गेली पाच वर्ष प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट म्हणून काम करीत आहे. आत्तापर्यंत संस्थेने २५० टन प्लास्टिक कचरा जमा केला असून कोकणातील नद्या व जंगले यांचे संवर्धन केले आहे. “धावू प्लास्टिक कचरा मुक्तीसाठी” ही संकल्पना घेऊन संघर्ष क्रीडा मंडळाबरोबर थीम पार्टनर म्हणून काम करीत आहे.
तरी चिपळूण मधील तसेच इतर स्पर्धकांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करणे सहकार्य करावे असे आवाहन संघर्ष क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन कदम आणि सह्याद्री निसर्ग मित्र चे अध्यक्ष श्री. भाऊ काटदरे यांनी केले आहे.










