महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका लांजाने घेतली गटशिक्षणाधिकारी यांची भेट

शिक्षकाच्या विविध प्रश्नावर केली महत्वपूर्ण चर्चा

लांजा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा लांजाने गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांची बुधवारी भेट घेतली आणि प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली.
गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात संघटनेचे
तालुकाध्यक्ष मंगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील विविध शैक्षणिक प्रश्नांसंदर्भात ही भेट घेण्यात आली. तसेच विविध प्रश्नांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ. विमल चव्हाण , लिपीक श्री.पत्याणे , विषयतज्ज्ञ श्री.पेंडखलकर उपस्थित होते.
भेटीमध्ये खालील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी पदवीधर वेतन त्रुटी बाबत पत्र दिले होते, त्याबाबत काय कार्यवाही झाली? याबाबत विचारणा करण्यात आली. एकूण ८९ पदवीधरांपैकी १५ पदवीधर शिक्षकांची सर्विस बुके पूर्ण झाली असून उर्वरित शिक्षकांची सर्विस बुक अपडेट करणे बाकी आहे. परंतु पदवीधर वेतन त्रुटीचे काम लवकर होणे आवश्यक आहे, त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे असे सांगण्यात आले. २० डिसेंबर पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील असे गटशिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिले.
प्राथमिक शिक्षकांचे गोपनीय अहवालाबाबत अहवाल भरताना तालुक्यामध्ये एक वाक्यता असावी. शिक्षकांच्या उल्लेखनीय बाबींमध्ये शिक्षकांनी केलेली विविध शैक्षणिक कार्याचा उल्लेख असावा. असे मत मांडण्यात आले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आयोजित शिक्षकांसाठी ज्या स्पर्धा घेण्यात त्या स्पर्धेचे निकाल वेळेत जाहीर करावे
वैद्यकीय देयकांबाबत बरेच दिवस शिक्षकांची बिले ऑफिसला पेंडिंग असतात तेव्हा वारंवार त्रुटी निघतात, त्यामुळे बिल आल्याबरोबरच त्रुटी आहेत त्या पूर्ण करून घ्याव्यात व बिले वेळेत सादर करावी .
सेवा पुस्तके अद्ययावत करण्याबाबत प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र वेळ देऊन सर्विस बुक ऑनलाईन करताना संबंधित शिक्षकाना बोलवून, कृती कार्यक्रम आखून वेळेत शिक्षकांचे सर्विस बुक अपडेट करावे.
शालेय पोषण आहाराबाबत सुट्टीच्या दिवशी व व शालेय वेळेनंतर पोषण आहार येतो तो घेण्यात येऊ नये असे सांगण्यात आले. तसेच जितकी मागणी आहे तेवढेच धान्य देण्यात यावे . तसेच पुरवठा दराने वेळेत धान्य पुरवठा करावा . यासंबंधी संबंधित पुरवठादाराला, सूचना व त्यासंबधी निर्देश दिले आहेत, असे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग यांनी सांगितले.
आयकराबाबत संबंधित श्री. राणे यांच्याशी नियोजित भेटीच्या वेळेस चर्चा करण्यात येणार आहेत. तर भविष्य निर्वाह निधी बाबत शिक्षकांनी जी प्रकरणे दाखल केली आहेत त्याचा त्वरित निपटारा करण्यात यावा, अशी मागणी प्राथ. शिक्षक संघाकडून करण्यात आली. जिल्हास्तरीय विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धेबाबत नियोजन, काटेकोरपणे करण्यात यावे. स्पर्धा निकोप व सर्वांना विश्वासात घेऊनच करण्यात येतील, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले.
आभार विजय कदम यांनी मानले.
सदर भेटी प्रसंगी तालुकाध्यक्ष मंगेश मोरे, नंदकुमार पाटोळे (तालुका नेते) मुस्तकीन पटेल (विभागीय अध्यक्ष), विलास गोरे सर(दिव्यांग कर्मचारी संघटना, जिल्हाध्यक्ष), सचिव बळी सोळंकी‌ काशिनाथ घाणेकर, नानासाहेब गोरड, बाळू नागरगोजे
संजय पवार , संदीप निखार्गे, प्रवीण सावंत, प्रजाप माने उमेश केसरकर ,दिलीप चव्हाण, प्रभाकर तांबे, विजय कदम ,लिंग्गन्ना भुसनूर आदी उपस्थित होते.