बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीवर सुहास खामकर यांची निवड

लांजा : तालुक्यातील आरगाव चे सुपुत्र असलेल्या सुहास खामकर यांची बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीवर निवड झाली आहे.
संपूर्ण महानगरपालिकेच्या विविध खात्यातील हजारो कर्मचारी त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असतात.सेवानिवृत्तीनंतर त्यांचे निवृत्ती वेतन आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी १९७४ मध्ये स्थापन झालेल्या ‘बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे’ गेल्या काही वर्षांत कार्य खऱ्या अर्थाने सेवानिवृत्तांना व त्यांच्या कुटुंबीयांना लाभदायक ठरावे असे होत आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर सुहास श्रीधर खामकर यांची एकमताने निवड झली आहे.
मुळचे लांजा तालुक्यातील आरगाव येथील रहिवासी असलेले सुहास खामकर हे नोकरी -व्यवसाया निमित्ताने सध्या ठाणे येथे राहतात. त्यांच्या या निवडी बद्दल राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड तसेच मित्रमंडळी, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.