राजापुरात नगराध्यक्षपदाच्या एका तर नगरसेवक पदाच्या सात उमेदवारांची माघार

लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी तिरंगी लढत
तर नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ५१ उमेदवार रिंगणात
अकरा जागी तिरंगी तर नऊ जागी दुरंगी लढत

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या एका अपक्ष उमेदवाराने तर नगरसेवक पदासाठीच्या सात अशा एकूण आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या बंडखोर उमेदवार शीतल पटेल यांनी माघार घेतल्याने आता या पदासाठी महायुती, महाविकास आघाडी व अपक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी तीन, तर दहा प्रभागातील वीस नगरसेवक पदांच्या जागांसाठी ५१ असे एकत्रित ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत .
शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजापुरातील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडीसह सर्व प्रभागातील लढातींचे चित्र स्पष्ट झाले असून अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची तिरंगी लढत होणार असून दहा प्रभागांतील एकूण वीस जागांमध्ये अकरा जागी तिरंगी तर नऊ जागी दुरंगी लढत होणार आहे.

राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी चार तर नगरसेवक पदाच्या वीस जागांसाठी ५८ असे एकूण ६२ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी एकूण आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी सात अर्जांचा समावेश आहे. भाजपाच्या बंडखोर उमेतवार शितल सुनील पटेल यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आपला अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता या पदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीच्या श्रृती ताम्हनकर, महाविकास आघाडीच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे व हिंदू महासभेच्या अपक्ष उमेदवार ज्योती खटावकर यांच्यात ही लढत होणार आहे.

नगरसेवक पदासाठी माघार घेणाऱ्या सात उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक एक, ब मधून शाहबाज सिराज खलिफे, प्रभाग क्रमांक दोन, ब मधून सोनल रमेश केळकर, प्रभाग क्रमांक चार, ब मधून आदित्य रमाकांत बाकाळकर, संजय मनोहर पवार आणि सुशांत विनायक पवार,प्रभाग क्रमांक सात, ब मधून आदिल इक्बाल ठाकूर आणि प्रभाग क्रमांक १० ब मधून कल्याणी कल्याण रहाटे यांचा समावेश आहे. राजापूर नगर परिषदेची यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार अशी चिन्हे दिसत असून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची निवडणूक तिरंगी होणार आहे. एकूण दहा प्रभागातील वीस जागांमधील ११जागी तिरंगी तर नऊ जागी दुरंगी लढत होणार आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी खटावकर ज्योती सुनील, खलीफे हुस्नबानू निजामुद्दीन आणि ताम्हनकर श्रुती श्रीकांत यांच्यात लढत होणार आहे. एकूण दहा प्रभागांच्या वीस जागांमध्ये अकरा ठिकाणी तिरंगी तर नऊ ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. यामध्ये दुरंगी लढत होत असलेल्या जागांमध्ये प्रभाग क्रमांक एक अ मधून बंडबे समीक्षा सतीश आणि रावण सान्वी सचिन . प्रभाग क्रमांक दोन ब मधून खलीफे अरबाज इब्राहिम आणि खडपे सौरभ संजय , प्रभाग क्रमांक पाच अ मधून जाधव सिद्धांत नाना आणि जाधव किशोर काशिनाथ प्रभाग क्रमांक पाच ब मधून मुल्ला शबाना निसार आणि काझी सुमैय्या जिलानी , प्रभाग क्रमांक सहा ब मधून खलीफे जमीर निजाम आणि सय्यद खलील अहमद हसन प्रभाग क्रमांक सात अ मधून गडकरी अमीना अशफाक आणि कुशे रसिका राजेंद्र , प्रभाग क्रमांक सात ब मधून ठाकूर सुलतान शरफुद्दीन आणि काझी असीम साजिद प्रभाग क्रमांक दहा अ मधून पेणकर सौरभ संदीप आणि मुजावर नूरमहंमद इस्माईल प्रभाग क्रमांक दहा ब मधून याहू नसीमा दाऊद आणि काझी साजिया हनीफ असे उमेदवार असणार आहेत.तर तिरंगी लढत होणाऱ्या ११ जागांमध्ये प्रभाग क्रमांक दोन अ मधून कुडाळी अनिल नारायण , चव्हाण दिलीप दिवाकर आणि करंगुटकर जितेंद्र सदानंद , प्रभाग क्रमांक दोन ब मधून चव्हाण संगीता भिकाजी , चव्हाण सुधा शांताराम आणि जठार सुयोगा सुनील प्रभाग क्रमांक तीन अ मधून तानवडे नेहा प्रमोद ,जाधव आरती गणेश आणि गुरव विद्या विवेक , भाग क्रमांक तीन ब मधून गुरव विनय सदाशिव,गुरव दीपक विनायक आणि गुरव विवेक सिताराम प्रभाग क्रमांक चार अ मधून चिपटे गार्गी गणेश पटेल शितल सुनील आणि बाकाळकर उर्मिला अमोल , प्रभाग क्रमांक चार ब मधून खटावकर राकेश सुनील,बाकाळकर सुभाष शाम आणि अमरे दिलीप लक्ष्मण , प्रभाग क्रमांक सहा अ मधून झारी अफरोज महंमद, रहाटे शीतल शशिकांत आणि मुकादम निलोफर मुदस्सर प्रभाग क्रमांक आठ अ मधून डंबे तनिष्का अजय , जाधव अनामिका सौरभ आणि नार्वेकर प्रेरणा प्रशांत ,प्रभाग क्रमांक आठ ब मधून दुधवडकर श्रीकांत विनायक , तांबे राहुल रमाकांत आणि मराठे सुशांत दिलीप ,प्रभाग क्रमांक नऊ अ मधून गुंडये रेणुका राजन, वादक जानवी गिरीश आणि सोगम नेत्रा निलेश ,प्रभाग क्रमांक नऊ ब मधून ओगले संजय गणपत, पवार सुबोध सुभाष आणि ओगले संजय पांडुरंग असे उमेदवार असणार आहेत.

राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून या लढती दुरंगी आणि तिरंगी अशा स्वरूपात होणार आहेत. समस्त राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची लढत देखील तिरंगीच होणार आहे. त्यामुळे राजापूर नगर परिषदेमध्ये प्रामुख्याने दुरंगी आणि तिरंगी अशाच लढती पहावयास मिळणार आहेत.