गोळवण येथे गॅस केवायसी कॅम्पला प्रतिसाद !

 मसुरे | झुंजार पेडणेकर ग्रामपंचायत कार्यालय गोळवण – कुमामे – डिकवल येथे इन्डेंन गॅस कंपनी मालवण यांच्यामार्फत EKYC कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील सुमारे 110 गॅस ग्राहकांनी ekyc चा लाभ घेतलेला आहे. यावेळी इन्डेन गॅस मालवण कार्यालयाचे श्री. मयेकर यांचे सहकार्य मिळाले. यावेळी त्यांनी गॅस धारकांना कंपनीच्या विविध योजनांची माहिती दिली. आभार सरपंच सुभाष लाड यांनी मानले.