मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री देव रामेश्वर देवालय परिसर कांदळगाव येथे 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ‘कुर्ला टू वेंगुर्ला ‘ या चित्रपटाचा प्रयोग आयोजित केलेला आहे. यासाठी श्री देव रामेश्वर देवालय विश्वस्त मंडळ कांदळगाव यांचे सहकार्य लाभले आहे. चित्रपट प्रेमींनी उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन लक्ष्मीपूजन उत्सव समिती कांदळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.











