मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ. नाथ पै सेवांगण शाखा कट्टाच्या वतीने कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचा २१ वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. प्रा. दंडवते आमच्या मनात रुजले आहेत. कट्टयाशी त्यांचे विशेष नाते होते. त्यांच्या भाषणाला कट्टा परिसरातील आबाल वृद्ध गर्दी करत असत. कोकणच्या प्रश्नाना न्याय देण्यासाठी ते अखेरपर्यंत झुंजत राहिले. प्राध्यापक मधु दंडवते यांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन विनिता काळे यांनी यावेळी केले.
किशोर शिरोडकर यांनी प्रा. मधु दंडवते यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आजच्या परिस्थितीत प्रा दंडवते यांचे समाजवादी , समतावादी आणि लोकशाहीवादी विचार अंगी कारणे गरजेचे आहे. हाच विचार भारताला
प्रगतीपथावर घेऊन जाणारा आहे असे ते म्हणाले.
दीपक भोगटे यानी प्रा. दंडवते यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेतला. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष, भारताचे अर्थमंत्री, भारताचे रेल्वे मंत्री व कोकणचे २० वर्ष खासदार एवढे सारी पदे त्यानी भूषविली. पण त्यांच्या निष्कलंक चारित्र्याला कोठेही डाग लागला नाही. अशक्यप्राय असणारी कोकण रेल्वे त्यांच्यामुळे च साकार झाली. बॅ नाथ पै सेवांगण त्यांच्याच विचाराने कार्यरत राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
ॲड. गीता काळे यानी सेवांगणाच्या विविध स्पर्धात भाग घेतलेल्या स्पर्धांच्या आठवणीना उजाळा दिला.
वैष्णवी लाड यानी आपले वडिल प्रा मधु दंडवते यांचे प्रचारक असल्याने लहानपणी त्यांना जवळून पाहता आले. त्यांचेच विचार मनावर रुजले असे सांगितले.
यावेळी आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेतील ७० विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य व प्रशस्ती पत्रकांचे वितरण करण्यात आले.
परिसरातील १० गरीब विद्यार्थ्याना मधु दंडवते सेवानिधीचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी विनिता काळे यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.वैष्णवी लाड व मनोज काळसेकर यानी
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
या कार्यक्रमास
किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, विनिता काळे, ॲड गीता काळे, वैष्णवी लाड, अर्चना धुत्रे, मंगल पराडकर, दादा वंजारे, विद्या चिंदरकर, शोभा म्हाडगुत, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, श्रीधर गोंधळी साक्षी अमरे, श्री अपराज, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.














