गोळवण येथे सिमेंट नाला बांध बांधणे कामाचा शुभारंभ!

 आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत प्रारंभ

मसुरे | झुंजार पेडणेकर ग्रामपंचायत गोळवण-कुमामे-डिकवलच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजने अंतर्गत पाणलोट उपचार गोळवण गट क्रमांक १/७/१ सिमेंट नाला बांध बांधणे (गोळवण देवराई रोणाचा बांध)या कामाचा शुभारंभ उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, तालुका कृषी अधिकारी श्री.अमोल करंदीकर, मंडळ कृषि अधिकारी पोईप श्री.डी.के.सावंत, रामेश्र्वर युवा कृषी मंडळ अध्यक्ष श्री. मंगेश सावंत , कृषी सहाय्यक श्री. नितेश पाताडे, ग्रा. पं. सदस्य श्री. गावडे सर, ग्रामपंचायत अधिकारी श्रीम. मनवर मॅडम, तसेच तांत्रिक कार्यकर्ता श्री. संदेश पवार, रामकृष्ण नाईक, नंदू नाईक, रमेश परब, दिवाकर परुळेकर, नाईक मॅडम, ग्राम कार्यकर्ता श्री. बाळकृष्ण खरात,संतोष चव्हाण, माजी सैनिक श्री. सत्यविजय पालव, ग्रा.पं. कर्मचारी करूणा राणे, बाबा परब , कोमल मांजरेकर, समिता गावडे इत्यादि उपस्थित होते.