रत्नागिरी ः प्रतिनिधी
घरगुती वादातून उंदिर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या महिलेचा उपचारांदरम्यान मुंबईतील नायर रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मधूरा मनोज मेस्त्री (31,रा.सुतारवाडी शिवार आंबेरे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने रविवार 4 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी घरगुती वादातून रेटॉल हे उंदिर मारण्याचे औषध प्राशन केले होते. तिला प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करुन अधिक उपचारांसाठी 8 ऑक्टोबर रोजी मुंबईतील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना शनिवार 10 ऑक्टोबर रोजी उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.












