मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब गावचा वार्षिक देवडाळप स्वारी उत्सव १२ ते १४ डिसेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत साजरा करण्याचे देवस्थानच्या सर्वसाधारण सभेत निश्चित करण्यात आले.
त्यावेळी देवस्थानचे मानकरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. १२ डिसेंबर रोजी जयंतीदेवी मंदिर ब्राह्मण देव ते रवळनाथ पावणाई मंदिर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे सुखवस्ती.१३ डिसेंबर रोजी रवळनाथ पावणाई मंदिरातून सकाळी ठीक ०८:३० वा. प्रस्थान करून शेत शिवारा भेट व तिथून पुढे डिगीवाडी,वरचीवाडी भूतोबा त्यानंतर सत्तावीस स्थळ भेट, वायगणकर वाडी ब्राह्मण देव तसेच मूळ पुरुष भेट त्यानंतर खालचीवाडी महापुरुष मंदिर ( पावणाई देवी एक रात्र माहेरी ) सुख वस्ती.
१४ डिसेंबर रोजी खालचीवाडी पावणाई मंदिरातील तळी वगैरे स्वीकारून तिथून पुढे आपकरवाडी महापुरुष देव भेट तसेच तिथून पुढे गावठणवाडीतील भक्तांच्या घरी भेट करून
मूळ स्थळात जयंतीदेवी मंदिरात समारोप.
यावेळी पंचायतन देवतांच्या सर्व स्थळांना भेटी देत सर्वाचा मानसन्मान करत
आशीर्वाद देत डाळप स्वारीचे मार्गक्रमण असणार आहे तरी यासाठी देवस्थान मानकरी व देवस्थान ट्रस्टच्या वतीने चोख नियोजन व व्यवस्थापन करण्यात येत असून पळसंब देवस्थान च्या या सर्वात मोठ्या उत्सवाला सर्व भाविकांनी, मुंबईकर चाकरमानी, रहिवाशांनी व माहेरवाशिणी, पाहुणे मंडळी यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थान च्या वतीने करण्यात येत आहे.
उपस्थितीचे आवाहन
श्री.जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटबल ट्रस्ट पळसंबयांच्या वतीने करण्यात आले आहे.











