मतदारांनी मतदान करण्यासाठी करण्यात आले आवाहन
लांजा (प्रतिनिधी) लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजवावा यासाठी लांजा नगरपंचायतीकडून लांजा शहर परिसरात ठिकठिकाणी मतदारांना आवाहन आणि मतदान जनजागृती चे उपक्रम राबवण्यात येत आहेत .
लांजा नगरपंचायतीची निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून मतदारांना जनजागृतीसाठी आवाहन केले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी रीना गुजर, स्वच्छता निरीक्षक सुरज जाधव, समुदाय संघटक सुशांत नाखरेकर, स्वच्छता मुकादम रवी कांबळे आदींसह अन्य कर्मचारी या जनजागृती मोहीमेत सहभागी झाले आहेत.
याबरोबरच सोशल मीडियाच्या व्हाट्सअप स्टेटस द्वारे देखील कर्मचाऱ्यांकडून मतदान जनजागृती केली जात आहे. चला मतदान करूया लोकशाही रुजू या, जना मनाचा पुकार मतदान आपला अधिकार, प्रलोभनाला नाही पडणार बळी लोकशाहीला देव बळकटी, ध्येय विकासाचे संकल्प मतदानाचा, विचार करा मतदान करा, लोकशाहीचा आधार करू सर्वाधिक मतदान यासारख्या विविध प्रचार वाक्य लोकांच्या माध्यमातून न्यू जोरदारपणे मतदानासाठी प्रचार केला जात आहे.
आज लांजा शहरातील एसटी स्टँड, मच्छी मार्केट व अन्य बाजार ठिकाणी मतदान जनजागृती करण्यात आली.











