लांजा BREAKING: स्लाइडिंगचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन चालकाचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटीतील घटना

लांजा (प्रतिनिधी) मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लाइडिंगचे साहित्य घेऊन भरधाव वेगाने जाणारा ट्रक पलटी झाल्याने ट्रक चालकाचा मृत्यू होण्याची घटना शुक्रवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर आंजनारी घाटीतील तीव उत्तराच्या ठिकाणी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्याम सिंग (व ५८, राहणार सुकरताल , उत्तर प्रदेश) हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक ( एच आर ३८, एक्स ०९९३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लाइडिंग चे साहित्य घेऊन चालला होता. हा ट्रक शुक्रवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्याच्या हद्दीतील अंजनारी घाटातील तीव्र उताराच्या ठिकाणी आला असता भरधव वेगाने जाणाऱ्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो महामार्गावर पलटी झाला. या अपघातामध्ये ट्रकचालक श्याम सिंग हा गंभीर जखमी झाला होता. गंभीर जखमी झाल्याने त्याचा या अपघातात मृत्यू झाला.
याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात ट्रक चालका विरोधात भारतीय न्याय सहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५(ब) , मोटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत.