संविधान अमृत महोत्सवी वर्ष: आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून बुधवारी समाजभूषण सुरेंद्र घुडे यांच्या विशेष माहितीचे होणार प्रसारण!

रत्नागिरी : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी, रत्नागिरी केंद्रातर्फे श्रोत्यांसाठी एक विशेष माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून महाराष्ट्र शासन समाजभूषण सुरेंद्र यशवंत घुडे यांनी दिलेल्या संविधान माहितीचे विशेष प्रसारण करण्यात येणार आहे.

देशाच्या लोकशाहीचा आधार असलेल्या संविधानाचे महत्त्व आणि त्यातील तरतुदी सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. जिल्ह्यातील आणि परिसरातील सर्व श्रोत्यांनी या महत्त्वाच्या माहितीपर प्रसारणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाजभूषण सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.