मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे खाजणवाडी येथील श्री देव गावडे पुरुष मंदिर येथे वार्षिक जत्रोत्सव २९ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबर रोजी
सकाळी ०९.०० वा. श्री ब्राम्हणांची उपस्थिती, श्री गणेश पूजा व श्री देव गावडे पुरुष पूजन,
दुपारी १२.३० वा. महाप्रसाद,दुपारी ०३.०० वा.लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम,
सायं. ०५.०० वा. श्री देव गावडे पुरुषाकडे श्रीफळ ठेऊन वार्षिकासंबंधी गाऱ्हाणे व श्री चाळ्याकडे भक्ष देणे,
रात्री ०८.०० वा. महाप्रसाद, रात्री ९.०० वा. सार्वजनिक ओटी भरणे व त्यानंतर उपस्थितांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम,
रात्री १०.३० वा.अवसारास साद, श्रींसोबत वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत मंदिराभोवती प्रदक्षिणा,
रात्री १२.०० वा. दशावतार गणेश वंदना व त्यानंतर नाट्यप्रयोगास सुरवात होणार आहे.
३० नोव्हेंबर २०२५
सकाळी ०७.०० वा.
अवसारास साद, दशावतारांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण अवतारात दहीकाला (गाडगे फोडणे) कार्यक्रम, मंदिराभोवती श्रीं सोबत प्रदक्षिणा व नंतर मंदिरात विसावा. तीर्थप्रसाद.उपस्थितीचे आवाहन ग्रामोत्कर्ष मंडळ खाजणवाडी – ट्रस्ट यांनी केले आहे.









