पोलीस पाटील संघटनेने घेतली प्रांताधिकाऱ्यांची भेट

बांदा : प्रतिनिधी

 

पोलीस पाटील संघटना प्रांत विभाग सावंतवाडीतर्फे सावंतवाडी प्रांताधिकारी समीर घारे यांची भेट घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस पाटील यांच्या अडवाणी जाणून घेतल्या. पोलीस पाटील संघटनेतर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

 

यावेळी प्रांताधिकारी घारे म्हणाले, गावात पोलीस पाटील, तलाठी व कोतवाल यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. गावात घडणाऱ्या घटनांची माहिती तातडीने पोलीस पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिली पाहिजे. गावात न्याय व शांतता राखण्याच्या दृष्टीने आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे, असे सांगितले

 

यावेळी प्रांताधिकारी समीर घारे यांनी पोलीस पाटील यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पोलीस पाटील संघटनेतर्फे प्रशासनाने सर्व पोलीस पाटील यांना ओळखपत्र देण्याची मागणी करण्यात आली. या मागणीला प्रांताधिकारी घारे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

 

 

यावेळी सावंतवाडी तालुकाध्यक्ष तानाजी सावंत, उपाध्यक्ष नितीन नाईक, सचिव लक्ष्मण गावकर,

प्रांत समिती अध्यक्ष जागृती गावडे, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संजय गवस, सचिव रुक्मिणी गवस, सचिन परब (चराठे), गजानन देसाई (डेगवे) आदी उपस्थित होते.