साळेल ग्रामदैवत श्री देव गिरोबाचा उद्या जत्रोत्सव 

चौके – प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील साळेल गावचे ग्रामदैवत श्री देव गिरोबा देवाचा वार्षिक जस्त्रोत्सव शुक्रवार दिनांक 28/11/2025 रोजी साजरा होत आहे.

यनिमित्त गिरोबा मंदिर येथे मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी तसेच ओट्या भरण्याचा कार्यक्रम,रात्री साळेल गावातून श्री लिंगेश्वर मंदिरातून गिरोबा मंदिरात गावकरी भाविकांसमवेत लिंगेश्वर देवाची पालखी प्रस्थान,गिरोबा मंदिर येथे उशिरा मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर गोरे दशावतार नाट्य मंडळ नाट्यप्रयोग सादर झाल्यावर सकाळी गाडगे फोडून जत्रौउत्सवाची सांगता होते.