चौके – प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा कुंभारमाठ केंद्र अंतर्गत प्राथमिक शाळांच्या बाल कला क्रीडा स्पर्धा 2025 या क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ 26 नोव्हेंबर रोजी केंद्र शाळा कुंभारमाठ येथे करण्यात आला. यावेळी कुंभारमाठ,घुमडे, कातवड आनंदव्हाळ – कार्लाचाव्हाळ, चौके, देवली या प्राथमिक शाळांमधील मुलांनी सहभाग घेतला होता.
यावेळी या क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभ कुंभारमाठ सरपंच सौ पुनम वाटेगावकर मॅडम यांच्या हस्ते येथील श्री देव स्वयंभू मंदिरात श्रीफळ अर्पण करून तसेच सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी कुंभारमाठ प्राथमिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सौ.दिशा चव्हाण, केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी सर, केंद्र मुख्याध्यापक श्रीमती खानोलकर मॅडम, श्री सावंत सर,चौके प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, चौके मुख्याध्यापक सौ भाग्यश्री कुनुरे मॅडम, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री दीपक गोसावी सर यांच्यासह केंद्रांअतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षक,ग्रामस्थ पालक उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रप्रमुख नंदकिशोर गोसावी सर यांनी आपल्या प्रस्ताविकात दोन दिवस येथे संपन्न होणाऱ्या क्रीडा व कला स्पर्धा बाबत सविस्तर माहींती देत उपस्थिल सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी कुंभारमाठ सरपंच पूनम वाटेगावकर मॅडम, दिशा चव्हाण मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभाचे सूत्रसंचालन दीपक गोसावी सर यांनी केले.











