खोटले येथे 2 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव!

मसुरे | झुंजार पेडणेकर:                     खोटले येथील श्री देव रवळनाथ मंदिरचा वार्षिक जत्रोत्सव 2 डिसेंबर रोजी होणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी हरीनाम सप्ताहाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. गावातील भजन मंडळासह अनेक गावच्या दिंडी भजने सहभागी होणार आहेत. 1 डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह ची सांगता व बायाची जत्रा होणार आहे. 2 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव होणार आहे.

या दिवशी माहेर वाशिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत.

रात्री देव तरंगची मंदिर प्रदक्षिणा होणार असून मध्यरात्री गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.

भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.