सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्यात महायुतीचं सरकार आहे. ही युती कायम रहावी तसंच ती प्रत्त्येक ठिकाणी असावी हे म्हणणाऱ्यांपैकी मी आहे आणि तशीच अपेक्षा मला सर्वाकडून आहे, असं मत आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी उपस्थित होते.
ते म्हणाले, तब्येत ठीक नसल्याने व डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याने शहरात फारसा फिरू शकलो नाही. प्रत्यक्ष लोकांपर्यंत गेलो नाही ही अशी पहिलीच वेळ आहे. सावंतवाडी व वेंगुर्ला शहराचा माझ्या राजकीय जीवनात मोठा वाटा आहे. त्यामुळे या शहरांचा अव्याहत विकास सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
राजघराण्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिलेत. मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलला ४५ कोटी मंजूर झाले, त्यांच टेंडर, वर्क ऑर्डर झाली आहे. बदली जागा देण्याचा ठराव देखील कॅबिनेटमध्ये मंजूर झाला. पण काही अटी समोरील लोकांना मान्य नाहीत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत नाही,
असं ते म्हणाले.
दरम्यान, शहर शांत ठेवण्याच काम मी केलय. लोकांच ऐक्य हीच माझी कमाई आहे. विविध जाती धर्मांची लोक एकोप्याने नांदतात. त्यामुळे या निवडणुकीत देखील सर्वांनी निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं.










