कु अन्वयी अनन्या अमित कदम हिला बालचित्रकार पुरस्कार जाहीर

राज्यस्तरावर काम करणाऱ्या शिक्षक ध्येय (नाशिक) या संस्थेतर्फे बाल दिनानिमित्त बालचित्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कुमारी अन्वयी अमित अनन्या कदम हिला बालचित्रकार पुरस्कार जाहीर झाला. बाल दिनानिमित्त घेण्यात आलेला चित्रकला स्पर्धेतही अन्वयीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. कुमारी अन्वयी ही सेंट थॉमस स्कूलची विद्यार्थिनी असून ती इयत्ता दहावी मध्ये शिकत आहे. साप्ताहिक शिक्षक ध्येयाचे संपादक श्री मधुकर गायदर सरांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न झाली. कुमारी अन्वयी ही चित्रकलेबरोबरच नृत्य, निवेदन आणि गायन या कला प्रकारातही पारंगत आहे. अभ्यासातील हुशारी सांभाळ इतर कलांनाही जोपासणाऱ्या अन्वयीला इंडस्ट्रियल रोबोटिक्स या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. प्रसिद्ध चित्रकार व रांगोळीकार आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले श्री राहुल कळंबटे सर यांचे कुमारी अन्वयी हिला मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. कुमारी अन्वयीचे वडील श्री अमित भाई कदम व आई सौ अनन्या अमित कदम यांनी शिक्षक ध्येय संस्थेचे तसेच सर्व मार्गदर्शक व शुभचिंतकांचे आभार मानले.