कणकवली : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक महामंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. शोएब अत्तार सर( लीड आपटीटूड ट्रेनर पुणे) तसेच महाविद्यालयाचे शैक्षणिक डीन डॉ.महेश साटम सर,प्रा. अरविंद कुडतरकर सर, प्रा. सोमनाथ मेलसागरे सर, प्रा. तुषार. मालपेकर सर, प्रा. तन्मय. कदम सर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीची पूजन, दीपप्रज्वलन व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले. कु. सानिका म्हातुगडे हिने सूत्रसंचालन तसेच भारतीय संविधानाचे महत्व यावर आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर सर, सर्व विभाग प्रमुख ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.अरविंद. व्ही. कुडतरकर डॉ.एस. टी.माने, श्री वैभव यादव सर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी समन्वयक कु.भार्गवी कवटकर , कु. तुकाराम नाईक , कु. साईश कोचरेकर आणि कु.जिगीशा म्हापसेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.













