पोदार प्रेप रत्नागिरी येथे संविधान दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी :
शहरानजिकच्या पोदार प्रेप येथे संविधान दिन विध्यार्थ्यांकडून विविध उपक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला.
हा दिवस साजरा करण्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले कारण ह्या दिवशी 1949 मध्ये भारतीय संविधानाची स्वीकृती करण्यात आली होती व भारत देशाच्या लोकशाही तत्वाचा पायाही ह्याच दिवशी घालण्यात आला.
भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान करण्यासाठी व युवा विध्यार्थ्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या मुख्य तत्वाची रुजवाट करण्यासाठी मुलांसोबत काही विशिष्ट उपक्रम घेण्यात आले.
राष्ट्रीय उपक्रम 2022 मधील पंचकोशिय दृष्टिकोनानुसार, जो शरीर, प्राणशक्ती, मानसिक, बौद्धिक आणि आनंदी स्तर या पाच स्तरामध्ये सर्वांगीण विकास याचा समन्वय साधत लहान मुलांच्या वयाला अनुरूप असे उपक्रम घेण्यात आले.
त्यामध्ये शारीरिक समन्वय वाढवणे, विविध हालचाली, निर्णयक्षमता प्रोत्साहित करणे, पॅराशूट खेळ, मेमरी गेम, या खेळातून मुलांना संविधानाच्या मूल्यांची सखोल समज होईल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होईल असे विविध उपक्रम साजरे केले गेले.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक वृंदानी विशेष मेहनत घेतली तसेच शाळेच्या प्रेसिडेंट डॉ. स्वाती पोपट वत्स यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोदार प्रेप च्या मुख्याधपिका अस्मिता चोप्रा आणि पोदार शाळेच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.