प्रकाश घाडी यांचे काम आदर्शवत

धालवली कोतवाल प्रकाश घाडी यांचा ग्रामस्थांतर्फे सेवानिवृत्ती निमित्त सन्मान

आचरा–अर्जुन बापर्डेकर

धालवली येथील तलाठी कार्यालयात गेली अनेक वर्षे कार्यरत कोतवाल प्रकाश घाडी लोकांमध्ये मिळून मिसळून वागत ग्रामस्थांना सहकार्याच्या भावनेतून काम करत असत त्यांचे हे काम आदर्शवत असे होते. असे मत कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर,पोंभुर्ले उपसरपंच सादिक डोंगरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या सोबत

मंडल अधिकारी चिंतामण भोये,कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर, धालवली उपसरपंच हमजाभाई सोलकर,पोंभुर्ले सरपंच प्रियांका धावडे,उपसरपंच सादिक डोंगरकर,

धालवली पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती राय, ब्रम्हदेव देवस्थानचे अध्यक्ष सुधिर रानडे, सिमा करंदीकर, कविता राणडे, गोखले,तलाठी सुनीता मेस्त्री, प्रथमेश आसोलकर, रमाकांत डगरे,शांतेश नाडकर्णी, कोतवाल हर्षला राणे, विवेक भोगटे,लक्ष्मण घाडी, संतोष महाडिक, पोलीस पाटील अकिल सोलकर, सुरेश शृंगारे,यांसह धालवली,कोर्ले,पोंभुर्ले ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी सरपंच सीमा करंदीकर,श्रीमती गोखले, पशुवैद्यकीय अधिकारी श्रीमती राय,यांनी घाडी यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पाटगाव व फणसगाव मंडल विभागातर्फे भेटवस्तू देवून घाडी यांना गौरविण्यात आले.तसेच कोर्ले,धालवली ग्रामस्थांतर्फेही भेट वस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धालवली तलाठी सुनीता मेस्त्री यांनी केले.तर आभार सीमा करंदीकर यांनी मानले.