रत्नागिरी ः
शहरातील जेलनाका येथे भरधाव कंटेनरने कार आणि बोलेरो पिकअप गाडीला धडक देत अपघात केला. यात अपघातात कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून उजव्या बाजुकडील टायरही पंक्चर झाला आहे. अपघाताची ही घटना शनिवार 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.15 वा.सुमारास घडली.
शनिवारी सकाळी 10.15 वा.सुमारास कंटेनर (एमएच-14-केओ-2263) वरील अज्ञात चालक भरधाव वेगाने मारुती मंदिर ते जयस्तंभ असा जात होता. तो जेलनाका येथे आला असता लाला कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या वळणावर लाला कॉम्प्लेक्स ते जेलरोड जाणारी बोलेरो पिकअप गाडीला आणि कंटेनरच्याबाजुनेच जयस्तंभाच्या दिशेने जाणाऱ्या कारला धडक देत अपघात केला. यात कार (एमएच-08-बीई-3145) ला उजव्या बाजुस कंटेरची धडक बसल्यामुळे काराच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. कारचा उजवा टायर फूटून गाडी पंक्चर झाली तसेच उजवा हेड लाईट पूर्णपणे निकामी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस आणि वाहतुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजुला घेत खोळंबलेली वाहतुक सुरळित केली.सायंकाळी शिरापर्यंत या अपघाताची शहर पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.












