रशिया WhatsApp वर बंदी घालणार? कारण जाणून घ्या

Russia WhatsApp Ban: भारताचा मित्र देश रशिया WhatsApp वर बंदी घालू शकतो. रशियाने स्वत: चे देसी अ‍ॅपही स्थापित केले आहे जे WhatsApp सोबत स्पर्धा करू शकते. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 28 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी रोसकोम्नाडझोरने पुन्हा WhatsApp ला टार्गेट केले. एजन्सीने म्हटले आहे की, WhatsApp गुन्हेगारी रोखण्यासाठी तयार केलेल्या रशियन कायद्यांच्या अटी स्वीकारण्यास वारंवार नकार देत आहे.