विद्याधर चिंदरकर यांना जाहीर!
मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या वतीने देण्यात येणारा मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार वराड भंडारवाड्याचे सामाजिक कार्यकर्ते विद्याधर चिंदरकर यांना जाहीर झाला आहे.
ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते व बॅ. नाथ पै सेवांगण संस्थापक सदस्यांपैकी एक असणारे मधु वालावलकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी सामाजिक कार्यकर्त्याला हा पुरस्कार दिला जातो.
विद्याधर चिंदरकर हे वराड. भंडारवाडा, ता. मालवण या गावचे रहिवासी आहेत. पी. के. सावंत पतसंस्थेच्या कट्टा शाखेत ते कर्मचारी आहेत. एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते कट्टा दशक्रोशीत प्रसिध्द आहेत.त्यांचा पिंडच मुळी समाजसेवेचा आहे. गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला आहे. त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून त्या परिस्थितीवर मात करीत ते सतत दुसऱ्यांसाठी राबत असतात. त्यांचा दिवस सुरू होतो तो विद्यार्थ्यांना शाळेत पोचावं, कोणाला काही हवं असेल तर आणून दे, काहीही अडलं तर मदत कर, दशक्रोशीतील कोणत्याही व्यक्तीच्या निधन प्रसंगी ते आवर्जून हजर असतात. शक्य असेल ती सर्व मदत करत असतात.
त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी विद्याधर चिंदरकर यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
या अगोदर उदय नाडकर्णी, रमेश धुरी, अविनाश म्हाडगुत, सूर्यकांत परमेकर, भाई खोत, सुधाकर तांडेल, वामन पंडित
श्रीकांत सांबारी प्रेमानंद देसाई आदीना
हा पुरस्कार देण्यात आला आहे.
हा पुरस्कार रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता
वराड भंडारवाडा येथे मान्यवरांचे उपस्थितीत देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. देवदत्त परूळेकर, किशोर शिरोडकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खांडाळेकर , श्याम पावसकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे विकास म्हाडगुत, वैष्णवी लाड यांनी केले आहे.












