मोठी बातमी निवडणुकीची ! निकाल २१ डिसेंबरला लागणार

नागपूर:

राज्यातील काही नगरपरिषदान बाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती. ही निवडणूक 20 डिसेंबरला होणार होती त्यामुळे आता यासंदर्भात नागपूर खंडपीठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून 20 नगर परिषदांची वीस डिसेंबरला मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व नगरपरिषदांचे नगरपंचायतींची मतमोजणी ही 21 डिसेंबरला घेण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे

त्यामुळे आता ही एकत्रितरित्या मतमोजणी केली जाणार असून 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी आता थेट 21 डिसेंबरला होणार आहे त्यामुळेच आता प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी केंद्र 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत ही निवडणूक जवळपास 280 ठिकाणांवर होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगळ्या शहरात असल्याने जवळपास 280 पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूम 21 नोव्हेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागणार आहेत