सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वेंगुर्ला कणकवली व मालवण या नगरपालिका व नगरपंचायतींच्या होत असलेल्या निवडणुकीत सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान सुरू झाल्यानंतर सकाळी ११.३० पर्यंत जिल्ह्यात सरासरी ३० टक्के मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. यात सावंतवाडीचा टक्का थोडा कमी असून कणकवलीत जास्त मतदान होत असल्याचे दिसून आले आहे. सावंतवाडीत ११ .३० पर्यंत सरासरी २५.९२ टक्के, वेंगुर्ला २५.१९ टक्के, मालवण ३०.३२ टक्के तर कणकवली ३४. ७२ टक्के मतदान झाल्याचे पहावयास मिळाले. त्यात महिलांचा समावेश जास्त असल्याचे दिसले.













