निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लावता येईल का? खंडपीठाने विचारले

Maharashtra Election: सुनावणीवेळी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीचा निकाल 21 डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली आहे.

Maharashtra Election: निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सुरवातीला 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल लागेल, असे जाहीर केले होते. मग न्यायालयीन अपिलाचा पेच निर्माण झालेल्या संस्थांत 20 डिसेंबरला मतदान 21 डिसेंबरला मतमोजणीचा आदेश काढण्यात आला. त्यावर औरंगाबाद खंडपीठात काल झालेल्या सुनावणीवेळी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीचा निकाल 21 डिसेंबरला लावता येईल का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केली. त्यावर निवडणूक विभागाचे वकील वकीलांनी यासंदर्भातील निवेदन आज दुपारच्या सुमारास करण्यात येईल, असे सांगितले आहे. पैठण, कोपरगाव, अंबाजोगाई, उदगीरच्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर मंगळवारी होणाऱ्या निवडणुकांची तयारी झाली आहे. निवडणूक अधिकारी आणि स्टाफ केंद्रांवर पोहोचला आहे. म्हणून न्यायालयाने जेथे निवडणूक होणार आहे त्यांना परवानगी दिली.