भाजप उमेदवारांना दिल्या शुभेच्छा
कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पालकमंत्री नितेश राणे यांनी आज विविध बुथवर भेट देत शुभेच्छा दिल्या. कणकवली शहरातील अनेक बूथस्थळी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मतदान प्रक्रियेदरम्यान सतर्क राहण्याचे तसेच संघटितपणे काम करण्याचे ‘कानमंत्र’ त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. निवडणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी संघटनेच्या सर्व पातळीवर समन्वय राखण्याचे आवाहनही पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी यावेळी केले.













