वेंगुर्ले न.प. निवडणुक : दुपारी १.३० वाजे पर्यंत ४१.९७ टक्के मतदान
वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी वेंगुर्लेतील मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दुपारी १.३० वाजे पर्यंत ४१.९७ टक्के मतदान आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व ठिकाणी हे मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले मधील भाजप च्या मतदान बुधवर भेटी देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष पप्पू परब व पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळी पहिल्या दोन तासात १०.५१% मतदान झाले. चार तासा नंतर तब्बल २५.२% मतदान झाले. तर आता सहा तासा नंतर हा आकडा ४१.९७ टक्के पर्यंत पोहचला आहे.
दुपारी १.३० वाजे पर्यंत वेंगुर्ले मध्ये सर्व मतदान केंद्रावर मिळून पुरुष २०७१ व महिला २१७४ असे एकूण ४२४५ (४१.९७ टक्के) मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.












