वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.८० टक्के मतदान

वेंगुर्ले l प्रतिनिधी :वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत आज मंगळवारी मतदान प्रक्रिया उत्साहात सुरू असून दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५७.८० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १०,११५ मतदारांपैकी ५८४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दुपारच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा वाढलेला दिसून आला असून मतदान केंद्रांवर मतदारांची रांग लागलेली होती. निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन सतर्क असून पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. संध्याकाळपर्यंत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.