गुहागर :
गुहागर नगरपंचायत निवडणूकिसाठी आज मंगळवारी सकाळी 7.30 साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळच्या सत्रात दुपारी 1.30 वाजेपर्यंत याठिकाणी जवळपास 61.28 टक्के मतदान झाले होते.मात्र त्यानंतर पुढील 2 तासात मतदानाचा वेग मंदावल्याचे चित्र होते.दुपारी 3.30 वाजेपर्यंत या ठिकाणी एकूण 69. 12% इतके मतदान झाल्याची माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.
सकाळी 11.30 वाजेपर्यंत 2770 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये 1452 पुरुष मतदारांनी तर 1318 स्त्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर दुपारी 1.30 वाजेपर्यंत 3653 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.यामध्ये 1868 पुरुष मतदारांनी तर 1785 स्री मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर पुढील 2 तासात केवळ 8 टक्के मतदान झाले.













