विजयदुर्ग (प्रतिनिधी ) : गडकिल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य (कोकण विभाग) यांच्या वतीने किल्ले विजयदुर्ग वेशीवरती असलेल्या सरदार आनंदराव धुळप यांच्या समाधीजवळ स्वच्छता मोहीम करण्यात आली. या मोहीमेची सुरवात सरदार आनंदराव धुळप यांचे वंशज रघुनाथराव रुद्राजीराव धुळप यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. समाधीवर वाढलेली झाडे झुडपे काढण्यात आली. तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. मराठ्यांचे हे प्रेरणास्थान असल्याने मनाला शक्ती, उर्जा देणाऱ्या या वास्तू आहेत. याचे जतन, संवर्धन, संरक्षण झाले पाहिजे, ज्यामुळे पुढील येणाऱ्या पिढीला हा इतिहास समजू शकेल व या इतिहासामधून प्रेरणा भेटेल असं वक्तव्य यावेळी रघुनाथराव धुळप यांनी केले. याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था.महाराष्ट्र राज्य महिन्यातून १ दिवस महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यावर जाऊन अशा विविध स्वच्छता मोहीमा राबण्याचे काम गेली अनेक वर्षापासून करत आहे. या मोहिमेला १६ दुर्गसेवक उपस्थितीत होते.या मोहिमेला गौरव मणचेकर यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभलं.
Home ताज्या घडामोडी किल्ले विजयदुर्ग येथील आनंदराव धुळप यांच्या समाधीजवळ गडकिल्ले संवर्धन संस्थेमार्फत स्वच्छता मोहीम












