शिरगाव (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील साळशी–नाईकवाडी येथे गुरुवार ४ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या दिवशी सकाळी दत्ताचे मूळस्थान निवई येथे अभिषेक, पूजा, आरती, व तिर्थप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी नाईकवाडी येथील दत्त मंदिरात सायं. ५ वाजता अभिषेक, ६ वाजता दत्तजन्म सोहळा, महाआरती , ७ वाजता तिर्थप्रसाद व महाप्रसाद, सायं. ७.३० वाजता सुस्वर भजने असा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
तसेच शुक्रवार, दुपारी १ वाजता ब्राह्मण भोजन आयोजित केले आहे.
या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री दत्त प्रासादिक मित्र मंडळ, साळशी–नाईकवाडी यांनी केले आहे.











