हेवाळे बांबर्डे परिसरात पुन्हा गणेशहत्तींची ; मुख्य रस्त्यावर एस्ट्री!

दोडामार्ग :सुहास देसाईदोडामार्ग तालुक्यात हेवाळे बांबर्डे परिसरातून काही दिवसांपूर्वी घाटमाथ्यावर दाखल झालेले हत्ती पुन्हा एकदा बांबर्डे आणि घाटिवडे परिसरात दाखल झाले आहे. यात ‘गणेशहत्ती’ (नर हत्ती) आणि त्याच्यासोबत एक लहान मादी हत्ती यांचा समावेश आहे. त्यामुळे शेतकरीत घबराट पसरली आहे हेवाळे वीजघर बांबर्डे मुख्य रस्त्यावर अचानक सकाळी शेतकरी दत्ताराम देसाई हे मुख्य रस्त्याने प्रवास करत असताना, घाटिवडे ब्रिजजवळ हे दोन्ही हत्ती अचानक मुख्य रस्त्यावर समोर आले. यामुळे क्षणभर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी देसाई यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपले वाहन थांबवले आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. सुदैवाने, काही क्षणांनी हे हत्ती रस्त्यावरून जवळच्या वरच्या जंगलात निघून गेले. शेतकरी चिंतेत, वनविभागाकडे तातडीची मागणीसध्या परिसरात उन्हाळी शेतीचा हंगाम सुरू होत असतानाच, हत्ती पुन्हा दाखल झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.या भागातील शेतकरी यांच्या प्रमुख मागण्याहत्तींच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात करावेत.परिसरातील शेती आणि ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी तात्काळ पकड मोहीम राबवावी.बांबर्डे आणि घाटिवडे परिसरातील ग्रामस्थांनी हत्तींच्या कोणत्याही हालचालीची माहिती तात्काळ वनविभागाला कळवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.