गोकुळमध्ये आंतरराष्ट्रीय दिव्यांग दीन साजरा…

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ’च्या) वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने संघाने आपल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा सन्मान व्यक्त केला. यावेळी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ म्हणाले आज आंतरराष्ट्रीय बँक दिनानिमित्त सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्याचे संधी मला मिळाली हा दिवस समाजात दिव्यांग व्यक्तींच्या योगदानाची दखल घेण्यासाठी आणि त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी साजरा केला जातो दिव्यांग कर्मचारी कोणत्याही संस्थेचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यांना संधी,प्रोसातहन व सहकार्य मिळाल्यास ते अधिक प्रभावीपणे कार्यरत राहतात असे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालकविश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, युवराज पाटील, शशिकांत पाटील-चुयेकर, बयाजी शेळके,संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.