अलोरे ग्रा.पं. व तंटामुक्त समितीच्या वतीने संविधान रॅली

चिपळूण (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अलोरे व तंटामुक्त समितीच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान स्वीकृती दिनी प्रतिवर्षीप्रमाणे अलोरे गावामधून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. ज्या संविधानाने प्रत्येकाला प्रगतीची संधी आणी सन्मानाने जगण्याची हमी दिली त्याचा गौरव म्हणून अलोरेतील ग्रामस्थांनी संविधानाचा गौरव करत छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत, संविधानाची मूल्य आणी विशेषता असलेली घोषवाक्य म्हणत शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली.
जि. प. शाळा अलोरे कॉलनी विद्यार्थी यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय मूल्य सहज समजू शकतील असे माझे संविधान माझा अभिमान हे पथनाट्य सादर केले. त्यानंतर पोफळीवरून चिपळूणला निघालेल्या संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी होऊन रॅलीचे स्वागत करण्यात आले. माजी सरपंच सिद्धी चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ग्रामविकास अधिकारी अमर आयवळे यांनी संविधान प्रास्ताविक सामूहिक वाचन घेतले. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नितीन देवरे, पोलीस पाटील चेतन सावंत, माजी उपसरपंच तुषार चव्हाण, सदस्य निलेश चावरे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष वसंत चिपळूणकर, बांधकाम सेवक पतसंस्था माजी अध्यक्ष प्रकाश आंब्रे, फेडरेशन अध्यक्ष राकेश जाधव,सिकंदर चिपळूणकर, जितेंद्र कांबळे,रमजान कडवईकर,कमाल मुल्लाजी करामत मुल्लाजी, अस्लम कुंभार्लिकर, इक्बाल मुल्ला, तन्वीर कुंभार्लिकर वसीम काझी, संजय मोहिते, बळीराम मोहिते, अनंत मोहिते, अमित जाधव, अनिल मोहिते, राजेंद्र जाधव, प्रणय जाधव, गौतम जाधव, बबन जाधव, हेमंत जाधव, सीमा जाधव, अनिता जाधव अस्मिता जाधव, प्रतिभा जाधव, गीता जाधव, अनिता मोहिते, प्रणिता जाधव, माधवी जाधव, साधना जाधव, जयमाला जाधव, वर्षा चिपळूणकर, अंगणवाडी सेविका मंदाकिनी कदम, संघमित्रा मोहिते, शैलजा सकपाळ, आरोग्य विभाग कर्मचारी, मुख्याध्यापक लता कांबळे आदी शिक्षकवर्ग या रॅलीमध्ये मोठया संख्येने ग्रामस्थ सहभागी होते. सचिन मोहिते, प्रकाश आंब्रे, प्रमोद महाजन, अनंत मोहिते, शाहिद खेरडकर, रमजान कडवेकर, अनिल मोहिते, सीमा महाजन, वसंत चिपळूणकर यांनी रॅलीमध्ये विचार मांडले. ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रदीप चव्हाण, पी. के. देवरुखकर, रुजीं चव्हाण यांनी रॅलीला विशेष सहकार्य केले.