कोकण कला संस्थेतर्फे गायक संजय गमरे, प्रविण मोहिते यांचा सन्मान

चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील पोसरे गावाचे सुपुत्र आणि महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील गायक संजय शांताराम गमरे आणि गायक प्रविण तथा पी एम मोहिते यांचा सपत्नीक सम्यक कोकण कला संस्था रजिस्टर महाराष्ट्र यांच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने कोकणातील जुन्या नव्या कलावंतांचा सन्मान करण्यात आला.
कोकण सम्यक कला भूषण पुरस्कार सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल देऊन बौद्धजन पंचायत समिती मुंबईचे उपसभापती लक्षण भगत, संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, पदाधिकारी भगवान साळवी मुकुंद तांबे, नरेश शिंदे, विनोद धोत्रे आणि महाराष्ट्रातील नामवंत कवी गायक गायिका कलावंत मान्यवर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. गेली पंचवीस वर्षे कोकणासह महाराष्ट्रात सर्वत्र गीतगायनातून समाज प्रबोधन करत असतात. जुगलबंदी कार्यक्रमातही यांनी आपला ठसा सर्वत्र उमटविला आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यापुढे प्रबोधन करण्यासाठी सम्यक कोकण कला संस्थेने त्यांचा सन्मान मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथील सभागृहात सन्मान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.