पैसे वाचवण्यासाठी फ्रीजकडे दुर्लक्ष करू नका, लाईटबिल वाढत जाईल, स्फोटचाही धोका

Refrigerators Expiry Date: तुम्हाला फ्रीजची मुदत (Expiry Date) किती वर्षात संपते? हे माहिती आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो पण याचं ठोस उत्तर कुणालाही माहिती नसतं. ज्याप्रमाणे बऱ्याच डिव्हाइसेसची एक्सपायरी डेट असते, त्याचप्रमाणे फ्रीजची मुदत देखील काही काळानंतर कालबाह्य होते. मग ते अधिक वीज वापरू लागते. यामुळे धोकाही वाढतो. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.