आंबा घाट अपघात Update: भीषणता दाखवणारी अपघाताची छायाचित्रे

आंबा घाटातील अपघाताची भीषणता दर्शविणारी छायाचित्र


Breaking: आंबा घाटात भीषण बस अपघात!

खासगी बस दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना; अनेक प्रवाशांना दुखापत; बस झाडावर अडकल्याने अनर्थ टळला!

(रत्नागिरी):
आज पहाटे आंबा घाटातील एका तीव्र वळणावर एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस अनियंत्रित होऊन दरीत कोसळली. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण १०९ जण प्रवास करत होते, त्यापैकी सुमारे १०० प्रवाशांना किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत.

सुदैवाने, बस दरीत खोलवर न जाता एका मोठ्या झाडावर अडकली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

अपघातातील जखमींना तातडीने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

गंभीर  जखमी झालेल्या प्रवाशांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य आणि पुढील तपास सुरू आहे.